उड्डाणपुलावरून जूनमध्ये धावणार वाहने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’मध्ये पायाभूत सुविधांचा भाग असलेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांपैकी पहिल्या पुलावरून जून महिन्यात वाहने धावू लागणार आहेत. या पुलाच्या कामात असलेल्या रेल्वेच्या हद्दीमध्येही एआयटीएल काम करीत असल्याने पुलाच्या कामाला वेग आला आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला औरंगाबाद-जालना महामार्गाशी जोडण्यासाठी दोन रेल्वे ओव्हरब्रिज तयार करण्याची कामे सध्या शेंद्रा येथे सुरू आहेत. त्यातील पहिला उड्डाणपूल जून २०१८ पर्यंत खुला केला जाणार असल्याची माहिती ऑरिक प्रशासनातर्फे देण्यात आली. या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सध्या सुरू असून जूनपासून या शेंद्रा येथील औरंगाबाद इंडिस्ट्रियल सिटीचा थेट कनेक्‍ट हा औरंगाबाद-जालना महामार्गाशी राहणार आहे. उत्तर - दक्षिण असलेल्या या ओव्हारब्रिजच्या दोन्ही बाजूंच्या कल्वर्ट (पाणी वाहून नेणारी यंत्रणा) चे कामही सध्या सुरू आहे.

रेल्वेच्या हद्दीतील काम ‘ऑरिक’कडे
रेल्वे हद्दीत उड्डाणपूल अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे असल्यास ते रेल्वे विभागाकडूनच केले जाते. त्यासाठीची रक्कम ही रेल्वे खात्याच्या हाती सोपवून हे काम त्यांच्याच मार्फत पूर्ण करण्याचा नियम आहे; पण या पुलाचे पूर्ण काम औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडकडून केले जाणार आहे. हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. रेल्वेच्या हद्दीतील जागेत सध्या पिलर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून पुलाच्या दोही बाजूंना स्लॅबचे काम सध्या सुरू आहे.

Web Title: marathi news aurangabad news over bridge vehicle