औरंगाबाद: पीईएस-रयतमध्ये होणार "एमओयू' 

अतुल पाटील
सोमवार, 15 जानेवारी 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी शहरात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन, वसतीगृह भेटीनंतर प्राचार्यांची बैठक घेतली. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. रयत आणि पीईएस तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगले उपक्रम राबवले जातात. त्यासाठी आम्ही एकत्रित येत असल्याचे खासदार सुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

औरंगाबाद : पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)च्या पाच संस्था आणि रयत शिक्षण संस्था तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये एप्रिल 2018 मध्ये सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. याबाबत पीईएसच्या प्राचार्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी (ता. 14) रात्री साडेसात वाजता ही बैठक पार पडली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनी शहरात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिवादन, वसतीगृह भेटीनंतर प्राचार्यांची बैठक घेतली. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांचीही उपस्थिती होती. रयत आणि पीईएस तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगले उपक्रम राबवले जातात. त्यासाठी आम्ही एकत्रित येत असल्याचे खासदार सुळे यांनी पत्रकारांना सांगितले. 

पीईएसमध्ये झालेल्या बैठकीत सामंजस्य करार कसा असेल, याबाबत चर्चा झाली. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून तिन्ही संस्थातील फॅकल्टी, स्टुडंन्ट यांच्यात आदान प्रदान होईल. संशोधनासाठी एकमेकांना सहकार्य करण्यात येईल. तसेच अनेक उपक्रम एकत्रित येऊन राबवले जातील. ज्ञानाचे आदान प्रदान व्हावे, हा उद्देश असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. 

बैठकीला पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत वाडेकर, मिलिंद कला महाविद्यालयाच्या डॉ. वैशाली प्रधान, मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद शफीक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बेहरा, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या प्राचार्य जयश्री घोबले यांची उपस्थिती होती. 

Web Title: Marathi news Aurangabad news PES MoU