पोलिस अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

औरंगाबाद - औरंगाबादेतील मिटमिटा येथे पोलिसांनी दगडफेक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या अत्याचाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका घरात पाच ते सहा पोलिसांनी बळजबरीने घुसून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. शिवाय घराच्या दरवाजावर लाथा मारून तोडफोडही केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांविषयीचा रोष वाढला आहे.

सात मार्चला सायंकाळी सव्वाचारला मिटमिटा गावातील एका घरात घुसून पोलिसांनी एका विद्यार्थ्याला बाहेर काढले. त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या या दुसऱ्या व्हिडिओवरून पोलिसांनी गावातील नागरिकांवर केलेले अतोनात अत्याचार समोर आले आहेत.

Web Title: marathi news aurangabad news Police torture video viral