औकात में रहो हा लोकांनी बनविलेला पिंजरा - चेतन भगत 

अतुल पाटील
सोमवार, 26 मार्च 2018

औरंगाबाद - औकात में रहो हा लोकांनी बनविलेला पिंजरा आहे, तो तोडला पाहिजे. लायकीपेक्षा मोठी स्वप्ने पाहून ती छोट्या-छोट्या मेहनतीतून साकार करा. चांगली संगत ठेवून विशीतील शक्ती वाया घालू नका, असे आवाहन जागतिक दर्जाचे लेखक चेतन भगत यांनी तरुणाईला दिले. रोज स्वत:ला प्रोत्साहित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

औरंगाबाद - औकात में रहो हा लोकांनी बनविलेला पिंजरा आहे, तो तोडला पाहिजे. लायकीपेक्षा मोठी स्वप्ने पाहून ती छोट्या-छोट्या मेहनतीतून साकार करा. चांगली संगत ठेवून विशीतील शक्ती वाया घालू नका, असे आवाहन जागतिक दर्जाचे लेखक चेतन भगत यांनी तरुणाईला दिले. रोज स्वत:ला प्रोत्साहित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

"सकाळ' आणि "रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रा'तर्फे रविवारी (ता. 25) श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियॉं दर्गा चौक येथे आयोजित कार्यक्रमात चेतन भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भा.पो.से. सोमय मुंडे, नायब तहसीलदार गणेश जाधव, "रिलायबल'चे संचालक धनंजय आकात, "सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, युनिट हेड रमेश बोडके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

श्री. भगत पुढे म्हणाले, ""मला दहावीला 76 टक्‍के गुण मिळाल्यानंतर घरी शोकसभेसारखेच वातावरण होते. एसटीडी बूथ सुरू करण्याचा विचार होता. मात्र, आयआयटी झालो नाहीतर "औकात निघणार' हे ठरलेलेच होते. "मेंटल फ्रेमवर्क' तोडून "औकाती'पेक्षा मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केल्यानेच आज इथवर पोहचू शकलो,'' असे त्यांनी सांगितले.

प्रश्‍नोत्तरात त्यांनी विद्यार्थ्यांना विविध टिप्स दिल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला आपली एक जागा दिसली पाहिजे. घरातील वातावरण चांगले ठेवणे ही पालकांची जबाबदारी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

श्री. भगत व्यासपीठावर येताच, विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दाद देताना, त्यांनीही हजारोंच्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांसोबत इन्स्टाग्रामसाठी फोटो क्‍लिक करत सेल्फीही घेतले; तसेच या प्लॅटफॉर्मबद्दल भगत यांनी "सकाळ' आणि "रिलायबल'ला धन्यवाद दिले. 

विद्यार्थ्यांसाठी काही टिप्स.. 
आयुष्यात विशीचे महत्त्व ओळखून मेहनत करा. 
पुढील दहा वर्षे कष्टाचे आहेत, हे ठरवून घ्या. 
अनेकांत उशिरा येणारा आत्मविश्‍वास लवकर बाळगा. 
तुम्ही कुठून आलात याचे भांडवल करू नका. 
मोठी स्वप्ने छोट्या कामात विभागली तर साध्य करता येतात. 
एकट्याने काही गोष्टी साध्य करणे अवघड असते, म्हणून संगत महत्त्वाची आहे.

Web Title: marathi news aurangabad news reliable and sakal with chetan bhagat