शिवसैनिकांवरील गुन्हे, तडीपारी मागे घेण्यासाठी आयुक्तांना साकडे

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद: विविध पोलिस ठाण्यातर्गत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे षडयंत्र सुरु आहे. खोटे गुन्हे उकलून शिवसैनिकांना पोलिस त्रास देत आहेत. तडीपार करण्याच्या, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या पोलिस प्रशासन देत असल्याने हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची शनिवारी (ता 13) भेट घेतली.

पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शिवसैनिकांवर राजकीय द्वेषातून काही असंतुष्ट व्यक्ती पोलिसांकडे खोट्या तक्रारी देत आहेत. पोलिस अशा खोट्या गुन्ह्याची चौकशी न करताच खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. शिवसैनिक प्रत्येक वसाहतीमध्ये पोलिस प्रशासनाला नेहमीच सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्या-त्या भागात शांतता सुव्यवस्था राहण्यास मदतच होत असते. असे असतांना कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पोलिस प्रशासन शिवसैनिकांचे खच्चीकरण करुन त्यांच्यावर अन्यायकारक परिस्थिती निर्माण करित आहेत. पोलिसांकडून होणारा अन्याय गंभीर आहे. याची यापुर्वी प्रत्यक्ष भेटून शिवसैनिकांना न्याय मिळावा म्हणून विनंती केलेली होती. परंतू
त्याचा आपल्या पोलिस प्रशासनावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पोलिस प्रशासनाविरुध्द शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होईल तरी आपण शिवसैनिकावरील खोटे गुन्हे, तक्रारी याची शहानिशा करुन
पोलिसांकडून होणारा अन्याय त्वरित थांबवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे प्रकार आठ दिवसांत थांबले नाहीत तर आम्हाला नाईलाजाने पोलिस प्रशासनाविरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराही शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने दिला आहे. 

यावेळीशिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्वâ प्रमुख सुहास दाशरथे, अन्नासाहेब माने , जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सभागृह नेता विकास जैन, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, जयवंत ओक, बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, पूर्व विधानसभा संघटक रेणूकादास वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशिल खेडकर, बप्पा दळवी, ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, कला ओझा, सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी, अंजली मांडवकर, प्रतिभा जगताप, सुनिता देव, प्राजक्ता राजपुत, आशाताई दातार, विद्या अग्निहोत्री, शिल्परानी वाडकर, राजू राठोड, ज्ञानेश्वर डांगे, किशोर कच्छवाह, जयसिंग होलिए यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com