वाळूचा ट्रक सोडण्यासाठी पंचवीस हजारांची लाच

योगेश पायघन
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद - वाळूची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रकला सोडण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना खुलताबाद पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक गुरुवारी (ता. 19) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. बाबासाहेब चोखाजी थोरात (वय 33) असे संशयिताचे नाव आहे. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्याचे दोन मित्र खुलताबाद पोलिस ठाण्यात पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी गेले. तेथे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांना भेटले. त्यांनी तक्रारदाराला एक लाखाची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराच्या मित्राने त्यांची ओळख असलेल्या पोलिस थोरात यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यावेळी थोरात यांनी, तुम्हाला मदत करायला सांगून गाडी पण सोडायला सांगतो, असे सांगितले.

दरम्यान, तक्रारदारांनी थोरात आणि पाटील यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. त्यापैकी पंचवीस हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना थोरात याला पकडले. संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पोलिस ठाणे खुलताबाद येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Marathi news Aurangabad news Twenty-five thousand bribe to leave a sand truck

टॅग्स