औरंगाबादेत सावरकरांच्या पुतळ्यावर फेकला काळा रंग

योगेश पायघन
शनिवार, 10 मार्च 2018

घटनास्थळी पोलिस व महापालिकेचे अधिकारी पोहचले असून पुतळ्याची साफसफाई सुरू आहे. या घटनेचा सावरकरप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या घटनेला जबाबदार समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद : येथील समर्थनगर भागातील पोलिस कंट्रोल रूमच्या जवळच असलेल्या सावरकर पुतळ्यावर शुक्रवारी (ता.9) रात्री समाजकंटकांनी काळा रंग फेकला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी पोलिस व महापालिकेचे अधिकारी पोहचले असून पुतळ्याची साफसफाई सुरू आहे. या घटनेचा सावरकरप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असून या घटनेला जबाबदार समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Marathi News Aurangabad news veer savarkar statue