कचरा प्रश्‍नावर लवकरच तोडगा काढू : आमदार अतुल सावे

प्रकाश बनकर
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मोफत आरोग्य महाशिबिराविषयी सावे यांनी शनिवारी (ता. 24) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कचऱ्याविषयी भाजप पळ काढतय का, असे विचारले असता सावे म्हणाले, ''राज्यात युतीचे सरकार आहे. शहरात महापालिका युतीच्याच ताब्यात आहे. यात भारतीय जनता पक्ष पळ काढत नाही. याविषयी भाजपही गंभीर आहे. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपो येथे कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू न देण्याची आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतल्याने गेल्या आठवडाभरापासून शहरातील कचऱ्याची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, या प्रश्‍नावर शुक्रवारी (ता.23) पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेटी घेतल्या. यावर शनिवारी (ता.24) सायंकाळपर्यंत पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांची चर्चा होऊन तोडगा निघेल, अशी माहिती आमदार अतुल सावे यांनी दिली. 

मोफत आरोग्य महाशिबिराविषयी सावे यांनी शनिवारी (ता. 24) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कचऱ्याविषयी भाजप पळ काढतय का, असे विचारले असता सावे म्हणाले, ''राज्यात युतीचे सरकार आहे. शहरात महापालिका युतीच्याच ताब्यात आहे. यात भारतीय जनता पक्ष पळ काढत नाही. याविषयी भाजपही गंभीर आहे. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

आज ते मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करणार आहेत. सायंकाळपर्यंत या विषयावर काहीतरी तोडगा निघेल. कचरा प्रश्‍न शिवसेनेप्रमाणे आम्हीही गांर्भीयाने घेत आहोत. आम्ही मिळून हा प्रश्‍न सोडविणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Marathi News Aurangabad News Will Solve Garbage Problem says MLA Atul Save