भरचौकात कारखाली निदर्यीपणे चिरडून तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

औरंगाबाद - चित्रपटात चाकाखाली खुंदळुन चिरडण्याचा प्रकार दाखवले जातात, अगदी तशाच प्रकारे तीन तरुणांना त्यांच्याच ओळखीतील तरुणाने वाहनाची धडक देऊन चाकाखाली खुंदळले. जीव वाचला म्हणून तीनवेळा अंगावरुन गाडी घालुन त्याला ठार मारले. हा खळबळजनक प्रकार मुकुंदवाडीतील कामगारचौक ते लक्ष्मीचौकादरम्यान शूक्रवारी (ता. 23) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. मुलीशी बोलण्यावरुन दोघांत वाद होते अशी माहिती पोलिसांनी दिली. 

संकेत संजय कुलकर्णी (वय -18, रा. पाथरी, जि. परभणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत संकेत कुलकर्णी याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विजय कडूबा वाघ (वय -17) व शुभम संजय डंख (वय -20) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाठलागानंतर धडक देऊन तीनवेळा घातले अंगावर कार 
तरुण जागीच ठार, दोन जण गंभीर जखमी 
कामगारचौक-लक्ष्मीचौकदरम्यान प्रकार 
मुकुंदवाडीत भरचौकात फिल्मीस्टाईल थरार 
बघ्यांची गर्दी, भींतही पडली 
सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचा प्रयत्न 

Web Title: marathi news aurangabad news youth murder