बिबिका मकबराजवळ वीज गेली खांबाला चाटून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद, ता. 7 : पहाडसिंगपुरा भागातील आलमगीर मशिदीसमोर मोहन सलामपुरे यांच्या घराजवळच्या खांबावर शनिवारी (ता. सात) दुपारी पाऊणे दोन वाजता अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात वीज चाटून गेल्याने एकाच खळबळ उडाली.

याठिकाणी खेळात असलेली लहानमुले व बाहेर बसलेल्या महिला दचकल्याने एकाच धावपळ उडाली.

बिबिका मकबरा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा आणि पहाडसींगापुरा भागातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वीज केवळ चाटून गेल्याने सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून टीव्ही आणि फ्रिज चे काही संच जाळले आहेत. कंबावर स्पार्किंग झाल्याने तेथे घरघुती जोडण्याचे सर्व्हिस वायरचे तुकडे झाले आहेत. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी पूनम सलामपुरे यांनी दिली.

Web Title: Marathi news Aurangabad raining lightning