आयटी पार्क'मधील भाडे  परवडतील असेच आकारणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

औरंगाबाद -  चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांचे दर उद्योजकांना परडवतील असेच आकाराले जातील व यासंदर्भात दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता.19) विधान परिषदेत दिली. 
आमदार सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करून आयटी पार्कमधील उद्योजकांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

चिकलठाणा औद्योगिक परिसरात माहिती व तंत्रज्ञान उद्यान इमारत 35 वर्षांपूर्वीची असून सदरील ठिकाणी आयटी उद्योजक विविध सॉफ्टवेअरची निर्मिती करतात. सदरील सॉफ्टवेअर विदेशांतदेखील पाठविले जातात; मात्र एमआयडीसीकडून याठिकाणी असलेल्या उद्योजकांना जाचक अटी घालून दिल्या असून जागेचे भाडे उद्योजकांना परडवणारे नाहीत. एमआयडीसीकडून आयटी उद्योजकांसाठी आकारलेल्या भाड्याचे दर 7 रुपये प्रति चौ. फूट दरावरून 46 रुपये प्रति चौ. फूट असे केल्याने आयटी उद्योजक औरंगाबाद सोडण्याच्या तयारीत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सभागृहात सांगितले.

आपण स्वत: यासंदर्भात पुढाकार घेऊन उद्योगमंत्री यांच्यासोबत यापूर्वी बैठक घेतली. त्यात उद्योगमंत्र्यांनी सदरील भाडेवाढ कमी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र यावर अद्यापही काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आमदार चव्हाण यांनी उद्योगमंत्र्यांना सांगितले. 

उत्तर देताना श्री. देसाई यांनी एमआयडीसीने आयटी उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या गाळ्यांचे दर जास्त वाढविले असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचे मान्य केले. या संदर्भात आपण सदरील दराची पुनर्पडताळणी करून दर कमी करण्याची शक्‍यता तपासण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

Web Title: marathi news aurangabad The rent in IT Park will be treated as affordable subhas patil