ऊसतोड मजुरांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करणयास ठेवले होते, परंतु थंडीमुळे चुलीजवळ बसलेल्या या दोन मुलांचा हे गरम पाणी अंगावर पडल्याने गुरुवारी गंभीर जखमी झाले.

माजलगाव (जि. बीड) : शहरातील बंजारा नगर भागातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 30) रात्री घडली.

शहरातील बंजारा नगर भागातील विजय जाधव हे ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात पती पत्नी गेले होते. दोन्ही मुले वैष्णव (वय 6), वैभव (वय 3) आजी आजोबा यांच्याकडे सांभाळ करण्यासाठी ठेवलेले होते.

आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करणयास ठेवले होते, परंतु थंडीमुळे चुलीजवळ बसलेल्या या दोन मुलांचा हे गरम पाणी अंगावर पडल्याने गुरुवारी गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान पुणे येथे शनिवारी रात्री उशिरा या दोन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Web Title: Marathi news Beed news 2 children dead