बीड कारागृहातून पळताना कैद्याचे मोडले हात-पाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

बीड - येथील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून पळ काढण्याच्या प्रयत्नात कैद्याचे हात-पाय मोडल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव (वय 30, रा. रूपचंदनगर, ता. रेणापूर, जि. लातूर) असे जखमी कैद्याचे नाव आहे.

बीड - येथील जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून पळ काढण्याच्या प्रयत्नात कैद्याचे हात-पाय मोडल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ज्ञानेश्‍वर बालाजी जाधव (वय 30, रा. रूपचंदनगर, ता. रेणापूर, जि. लातूर) असे जखमी कैद्याचे नाव आहे.

अंबाजोगाईतील चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेला ज्ञानेश्‍वर जाधव हा चार सप्टेंबर 2017 पासून न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहे. तीन क्रमांकाच्या बॅरेकमधील 14 कैद्यांना स्वयंपाक करण्यासाठी आज पहाटे बाहेर काढण्यात आले. त्यात ज्ञानेश्वर जाधव व अन्य कैदी विकास देवकते याचा समावेश होता. पाणी आणण्याच्या निमित्ताने हे दोघे विहिरीकडे गेले. तेथून एकमेकांच्या मदतीने ते भिंतीवर चढले.

सुरक्षारक्षक झोपेत असल्याचे पाहून ज्ञानेश्‍वरने उडी मारली. त्यावेळी फरशीवर आदळून त्याचे हात-पाय मोडले. त्याला भोवळ आल्याचे पाहून विकास देवकतेने पलायनाचा विचार सोडून कारागृहात परतणे पसंत केले. काही काळाने एक कैदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर कारागृह पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत ज्ञानेश्‍वरने जखमी अवस्थेत नगर रोडवरील प्रवेशद्वार गाठले. तो कच्चा कैदी असल्याने त्याच्या अंगावर साधे कपडे होते. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. नागरिकांच्या मदतीने तो एका रिक्षातून जिल्हा रुग्णालयात पोचला. जमादार प्रकाश मस्के यांनी त्याला तेथे ताब्यात घेतले.

Web Title: marathi news beed news accused injured crime