लाचखोर शेळकेसह फडला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

बीड - एक लाख 15 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पकडलेला बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके व लेखा परिवेक्षक बब्रुवाहन फड याला न्यायालयाने 26 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोघांच्याही घरांची झडती घेण्याचे काम सुरू आहे. एका स्वस्त धान्य दुकानाच्या वादाची सुनावणी डॉ. शेळके याच्याकडे सुरू होती. बाजूने निकाल देण्यासाठी त्याने दोन लाखांची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारीची खातरजमा केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तथ्य आढळले. विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 22) सापळा रचून बब्रुवाहन फडला लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर डॉ. नरहरी शेळकेलाही अटक केली. दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Web Title: marathi news beed news narhari shelake and babruvahan fad custody