अडीच लाखांवर बालकांना पोलिओ लस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

बीड - आरोग्य विभागातर्फे रविवारी (ता. 11) जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दोन हजार 589 बूथ, तसेच फिरत्या पथकांमार्फत दोन लाख 90 हजार 12 पैकी दोन लाख 52 हजार 55 बालकांना पोलिओ लस देण्यात आली. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोहिमेला अधिक प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात एकूण 85 टक्के लसीकरण झाले. 

शून्य ते 5 वयोगटातील बालकांसाठी आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम वेळोवेळी घेण्यात येते. रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. अपेक्षित लाभार्थी संख्या दोन लाख 90 हजार 12 एवढी आहे. त्यापैकी दोन लाख 52 हजार 55 बालकांना लस देण्यात आली. ग्रामीण भागात 90.03 टक्के, तर शहरी भागात 74.05 टक्के बालकांना लस पाजली. जिल्हा रुग्णालयात सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते एका बाळाला लस देऊन या मोहिमेची सुरवात करण्यात आली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार उपस्थित होते. फिरत्या पथकांमार्फत जिल्हाभरातील वीटभट्ट्या, असंघटित कामगार क्षेत्र आदी ठिकाणी बालकांना लस देण्यात आली. 

लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारपासून शहरी भागात पाच दिवस व ग्रामीण भागात तीन दिवस घरोघर जाऊन पाच वर्षांखालील बालकांना लस देण्यात येणार आहे त्यासाठी आवश्‍यक तेवढ्या लसी उपलब्ध असून आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. 
-डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड 

Web Title: marathi news beed polio children