छत्तीसगड महिला प्रकरणात आणखी एक अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - छत्तीसगड येथील वीसवर्षीय तरुणीला औरंगाबादेत आणून वेश्‍या व्यवसायात ढकलल्याप्रकरणी प्रकाश उपाध्ये या आणखी एका संशयिताला सोमवारी (ता. 19) पोलिसांनी अटक केली. 

औरंगाबाद - छत्तीसगड येथील वीसवर्षीय तरुणीला औरंगाबादेत आणून वेश्‍या व्यवसायात ढकलल्याप्रकरणी प्रकाश उपाध्ये या आणखी एका संशयिताला सोमवारी (ता. 19) पोलिसांनी अटक केली. 

छत्तीसगड येथील तरुणीला औरंगाबादेत नोकरीसाठी आणले होते. परंतु, अन्नू नामक एजंट महिलेने तिला देहविक्री करण्यास भाग पाडले होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी अन्नूसह एका संशयिताला पुंडलिकनगर भागतून अटक केली होती. छत्तीसगड येथून एम. दिवाकर याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणातील चौथा संशयित प्रकाश उपाध्ये याला शहरातून अटक केली. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: marathi news Chattisgarh woman case One arrested aurangabad news