मुख्यमंत्री फडणवीस हे राजकीय दहशतवादी - राजू वाघमारे

माधव इतबारे 
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारणाऱ्या सात ते आठ हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचे गंभीर कलम लावण्यात येत आहे. संघाच्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला हा राजकीय दहशतवाद आहे. निरपराध युवक, महिलांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सोमवारी (ता. 15) दिला. 

पत्रकारांशी बोलताना श्री. वाघमारे म्हणाले, कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणावरही कारवाई केली जाणार नाही आणि झालेले नुकसान सरकार भरून देईल, अशी भूमिका जाहीर केली होती. जे बोलतात ते न करणारे अशी ख्याती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नंतर राज्यभर बहुजन युवकांची धरपकड सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात कोम्बींग ऑपरेशन राबवून आतापर्यंत सात ते आठ हजार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील अनेकांनी कुठे तोडफोडही केलेली नाही. संघाच्या दबावामुळे बहुजनांमध्ये तेढ निर्माण व्हावे व विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

मोदींमुळेच भिडे, एकबोडेंना अभय 
कोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हे दाखल असलेले मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचे संघ व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध आहेत. मोदी यांच्या आदेशामुळेच दोघांच्या विरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप श्री. वाघमारे यांनी केला. 

संघामुळेच महाराष्ट्रात जातीय उद्रेक 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच राज्यात वारंवार जातीय उद्रेक होत असल्याचा आरोप श्री. वाघमारे यांनी यावेळी केला.

Web Title: marathi news CM is a political terrorist said raju vaghmare