अंबाजोगाईत कक्षाच्या आगीत कागदपत्रे जळाली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

अंबाजोगाई - येथील दुसरे दिवाणी न्यायालय कक्ष क्रमांक दोनमध्ये गुरुवारी (ता. १५) पहाटे आग लागून तेथील टेबलावरील काही कागदपत्रे जळाल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असून, विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

येथील शहर पोलिस ठाण्याच्या बाजूलाच तालुका न्यायालय आहे. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास यातील सहदिवाणी न्यायालय कक्ष क्रमांक दोनमध्ये अचानक आग लागली. पोलिसांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ ही आग आटोक्‍यात आणली. तोपर्यंत तेथील टेबलावर असलेली काही कागदपत्रे जळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. या घटनेत नेमकी कोणती कागदपत्रे जळाली त्याची पडताळणी झाल्यानंतरच निश्‍चित स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक सोमनाथ गित्ते यांनी सांगितले.

Web Title: marathi news fire Ambajogai marathwada

टॅग्स