भूजल खाते माझ्याकडून जाता जाता वाचले : बबनराव लोणीकर

Jalgaon News Babanrao Lonikar Minister
Jalgaon News Babanrao Lonikar Minister

औरंगाबाद : "भूजल खाते माझ्याकडून जाता जाता वाचले. हा विभाग जलसंपदामंत्री राम शिंदे यांच्याकडे पाहिजे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मी जोर लावल्याने तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही," असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

'भूजल अभियंता संघटने'चे 21 वे वार्षिक अधिवेशन जेएनईसी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट सभागृहात रविवारी (ता.4) दुपारी बारा वाजता पार पडले. यावेळी ते बोलत होते. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, राहुल श्रीरामे, अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष हनुमंत ठोकळे, राजू बागडे, प्रभारी सह संचालक संजीव वानखेडे, रामदास आरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वाळूपट्टांसाठी महसूल खात्याचे तहसीलदार, जलसंधारण खात्याची आणि कृषी विभागाची जलयुक्त शिवाराच्या कामांची जागा निश्चिती यांच्यासह भूजलाचा व पाण्याचा संबंध असलेली कामे भूजल विभागाच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत भूजल विभागाचे अधिकारी वाढवले आहेत. म्हणून अभियंत्यांनी या खात्याचे महत्व आणि अधिकार समजून घ्या, असे सांगत महसूल, जलसंपदा व जलसंधारण, कृषी व ग्रामविकास विभागाच्या चाव्या भूजल विभागाकडे असल्याचे बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.

बैलाला नाव तर अधिकाऱ्यांना का नको?

भूजल खात्यातील अभियंत्याला खोदन अभियंता हे नाव या पदाला का दिले. हे तीन वर्षात कळले नाही. बैलाला राजा, प्रधान नाव असते, तर अधिकाऱ्यांनाही सन्मानाचे नाव असायला पाहिजे. ते बदलण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लवकरच बैठक बोलावू व भूजल संघटनेच्या अभियंत्यांच्या समस्या मार्गी लावू, असे आश्वासन लोणीकर यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com