जालन्यात बंद; बससेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

बस सेवा बंद असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचा शुकशुकाट होता. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बसस्थानक साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती.

जालना : भारिप बहुजन महासंघाने बुधवारी ( ता. तीन) दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जालना शहरात प्रतिसाद मिळाला आहे. 

शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बंद ठेवल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने 100 टक्के बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट आहे. मंगळवारी (ता.दोन) झालेल्या दगडफेकीत बसेसचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास 14 बसेसची तोडफोड झाली. त्यामुळे जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले  तर अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. बुधवारी (ता.3) बसेसची पुन्हा तोडफोड  होऊ नये याची खबरदारी घेत, बुधवारी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान  शहरातील शाळांना सुटी देण्यात आली. तसेच शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात ठीक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्त ही सतत सुरु आहे.

बस सेवा बंद असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचा शुकशुकाट होता. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बसस्थानक साफ करण्याची मोहीम हाती घेतली होती.

Web Title: Marathi news Jalna news bandh in Jalna