भारिप बहुजन महासंघाचा मोर्चा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (ता. तीन) बंद पाळण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मामा चौक  येथून निषेध मोर्चा काढला.

जालना  : कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (ता. 3) शहरातील मामा चौक येथून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली.

कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (ता. तीन) बंद पाळण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मामा चौक  येथून निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा मामा चौक, मस्तगड, गांधी चमन, शनि मंदिर, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कोरेगाव येथील  घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याची शक्यता आहे.

Web Title: Marathi news Jalna news bandh in Jalna for Bhima Koregaon incident