जालना जिल्ह्यात गारपीट; आंबा, गहू, फळबागांचे नुकसान

उमेश वाघमारे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मंठा, अंबड शहर परिसरातही गारपिटीचा तडाखा बसला. तर घनसावंगी शहरासह कुंभारीपिंपळगाव,  जांब समर्थ, अंबडशहरासह  रोहिलागड, शहागड, गोंदी परिसरात ही अवकाळी बरसला.

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात अवकालीचा तडाखा बसला आहे. जालना शहरातसह ताकलुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर मंठा, अंबड, मंठा शहरात गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळं फलबागांसह गहू आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता.11) अवकाळी पाऊस झाला. जालना शहरासह परीसरात गारपीट झाली. त्यानंतर काही काळ जोरदार पाऊसने हजेरी लावली. मंठा, अंबड शहर परिसरातही गारपिटीचा तडाखा बसला. तर घनसावंगी शहरासह कुंभारीपिंपळगाव,  जांब समर्थ, अंबडशहरासह  रोहिलागड, शहागड, गोंदी परिसरात ही अवकाळी बरसला. या अवकाळी पावसामुळे आणि गरपीटीमुळे फळबागांसह रब्बी पिकाने मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Marathi news Jalna news rain and hailstorm in Jalna