भाजप आमच्या हिटलिस्टवर: राजू शेट्टी

उमेश वाघमारे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेते. त्यामुळं शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे हे आपले व्यक्तिगत मत आहे, मात्र त्यांचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

जालना : भाजप सरकारने शेतकऱ्यांना फसवून मते घेतली आहेत, त्यामुळे भाजप आमच्या हिटलिस्टवर आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे असा व्यक्तिगत सल्ला ही त्यांनी दिला.

जालना येथे सीए गोविंदप्रसाद मुंदडा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्याच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव देऊ असे अर्थ संकल्पात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे, मात्र सरकार तो देत नाही. अर्थ मंत्र्यांचे अर्थ संकल्पाचे भाषण ऐकण्यासारखे होते. मात्र शेतकऱ्यांसाठी हा अर्थ संकल्पात ऊसाच्या पाकात गाजर पडून दिल्या प्रमाणे आहे. त्यामुळे भाजप आमच्या हिटलिस्टवर असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेते. त्यामुळं शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे हे आपले व्यक्तिगत मत आहे, मात्र त्यांचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Marathi news Jalna news Raju Shetty criticize government