मंठातील बाजारपेठ पुन्हा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मंठा (जि. जालना) - येथे बुधवार (ता. 3) ला सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहे. 
कोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंठा येथे तिव्र प्रतिसाद उमटले होते. मंगळवार (ता. 2) रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, बाहेर गावचे प्रवासी, छोटे व्यावसायिक, आजारी आदींना बंदचा त्रास झाला. 

आंबेडकरवाद्यांनी बुधवार (ता. 3) रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असल्याने आज शहरातील नागरीक संभ्रमात होते. सकाळी काही दुकाने व चहाची हाॅटेल उघडले होते, त्यास काही आंबेडकरवादी तरुणांनी विरोध केला. परंतु मंगळवार (ता. 2) रोजी सर्व व्यापारी व नागरीकांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल आज बाजारपेठ दहा वाजल्यापासून सुरळीत सुरु आहे. बसगाड्यांची वाहतूक सुरळीत नसल्याने अनेक प्रवासी खाजगी वाहन व दुचाकी वाहनावर प्रवास करीत आहेत.

Web Title: Marathi News Koregaon Bhima Jalna Mantha Market