'गुगल'च्या स्पर्धेत आदित्य गिरी विजेता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

लातूर - आघाडीचे सर्च इंजिन कंपनी गुगलतर्फे घेण्यात आलेल्या "कोड इन' स्पर्धेत येथील आदित्य दत्तात्रय गिरी विजेता ठरला आहे. या स्पर्धेत देशातील 16 विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, त्यात आदित्यचा समावेश आहे. याबद्दल त्याला व त्याच्या पालकांना अमेरिका व गुगलची मोफत सफर मिळणार आहे.

आदित्य हा येथील राजा नारायण लाहोटी विद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी आहे. गुगलतर्फे गेल्या सात वर्षांपासून 18 वर्षांखालील मुलांची सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक स्तरावर कोड इनची स्पर्धा घेण्यात येते. सन 2017 मध्ये झालेल्या स्पर्धेत 78 देशांतील तीन हजार 555 मुलांनी सहभाग घेतला. त्यात पन्नास विद्यार्थ्यांची निवड गुगलने विजेते म्हणून केली आहे. जगातील पन्नास विजेत्यांत भारतातील आदित्यसह 16 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तो एकमेव विद्यार्थी आहे.

गुगलने 31 जानेवारी रोजी गुगल वेबसाइट ब्लॉगवर हा निकाल घोषित केला आहे. आदित्यने इयत्ता नववीला असताना ऑनलाइन मतदान प्रक्रियेचे सॉफ्टवेअर तयार करून भारत निवडणूक आयोगाला पाठविले होते. सध्या त्यावर विचार सुरू आहे. कोणाचेही मार्गदर्शन न घेता त्याने हे यश मिळविले असून, याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आदित्य हा अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. बी. गिरी यांचा मुलगा आहे.

Web Title: marathi news latur news google competition aaditya giri win