पत्नीची बदनामी केल्याने महिलेची गावभर धिंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

आलूर : पत्नीची गावात बदनामी केल्याच्या कारणावरून एका महिलेच्या गळ्यात चपला बांधून तिची धिंड काढल्याची घटना आलुर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे शुक्रवारी (ता. २२) दुपारी घडली आहे . याप्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, की आलूर येथील शिवानंद सोमय्या स्वामी सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत. तो दोन दिवसांपूर्वी ते गावी आले आहेत. त्यांच्याच भावकीतील एका महिलेने आपल्या पत्नीची गावात नाहक बदनामी सुरू केल्याची माहिती स्वामी यांना मिळाली. त्यामुळे याचा राग मनात धरून स्वामी यांनी बदनामी करणाऱ्या महिलेला जाब विचारून मारहाण केली. त्यानंतर चपला गळ्यात घालून त्या महिलेची गावात 
धिंड काढली. धिंड काढत असताना काही तरुणांनी पुढाकार घेऊन स्वामीला विरोध करून त्या महिलेची सुटका केली. त्यानंतर जखमी झालेल्या पीडित महिलेला गावातील लोकांनी मुरूम पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तिच्यावर मुरुमच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

पोलिसांनी जखमी महिलेचा जबाब घेतला असता, तिने शिवानंद स्वामी याने लाथाबुक्याने मारहाण केली व चपलाचे हार घालून गावातून धिंड काढली व गावातीलच राजू मडीवाळ आणि त्याच्या आई-वडिलांनी स्वामी यांना माहिती दिल्यामुळे त्याने मला मारहाण केली, असे जबाबात म्हटले आहे.

या जबाबानुसार पोलिसांनी शिवानंद स्वामी, राजू मडीवाळ व राजूचे आई-वडिल अशा चौघांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक छाया दामोदरे तपास करीत आहेत.

Web Title: marathi news local crime osmanabad news