स्वीटमार्ट तोडफोडीच्या निषेधार्थ माजलगांव शंभर टक्के बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

बीड : शहरात मागील दोन दिवसांपूर्वी अज्ञात आठ ते दहा जणांनी दोन स्वीटमार्ट फोडल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज ता. 18 सोमवारी माजलगांव बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये आज शंभर टक्के माजलगांव बंद पाळण्यात आला. 

शनिवारी सायंकाळी शहरातील आंबेडकर चौकातील मधू बिकानेर स्वीटमार्ट व ठक्कर बाजार शाॅपिंगमधील महादेव स्वीटमार्ट या राजस्थानी समाजाच्या दुकानाची काही माथेफिरूंनी तोडफोड करून नासधूस केली होती. या घटनेत दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाले व तेथील मालक, कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे माजलगांव बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डाॅ. उध्दव नाईकनवरे, पापा सोळंके, भाजपा तालुकाध्यक्ष हनुमान कदम, दत्ता महाजन, विनायक रत्नपारखी, राजेंद्र होके पाटील, आनंत रूद्रवार, शशिकिरण गडम, संजय रेदासणी, पद्माकर कांबळे यांचेसह अनेकजण सहभागी झाले होते.

Web Title: marathi news local news majagaon beed sweet mart attck protest