वडवणी कडकडीत बंद; अपमानकारक वक्तव्याचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

वडवणी - छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजाविषयी एका अज्ञाताने अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. १६) वडवणी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. काल (ता. १५) रोजी सकळ मराठा समाजाकडून वडवणी येथील व्यापाऱ्यांना विनंती करून आज (ता. १६) वडवणीचे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळीपासूनच शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी ९ वाजता सर्व समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते. तेथून पुढे आंबेडकर चौक पासून फेरी काढत तहसील कार्यालयावर हा मोर्चा आला व नंतर तहसीलदार यांना निवेदन देऊन समर्पण करण्यात आले.

Web Title: marathi news maratha community rally