मोर्चाला परभणीतून एक लाख मराठे जाणार, जिल्हास्तरीय बैठकीत निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

कर्मचाऱ्यांची दोन दिवस सामुदायिक रजा
मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा समाजातील शासकीय, अशासकीय 
अधिकारी-कर्मचारी नऊ आणि दहा ऑगस्ट अशा दोन दिवस सामुदायीक रजा घेणार आहेत. संपूर्ण राज्यातच असे नियोजन केल्याची माहीती यावेळी दिली आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी परभणी शहरात चार ऑगस्ट रोजी सकाळी 10 दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरु होणारी ही रॅली स्टेशन, बसस्थानक मार्गे जिंतूर रोड, विसावा फाटा मार्गे परत वळसा घेऊन सरकारी दवाखाना मार्गे, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ परत शिवाजी महाराज पुतळा तेथुन वसमत रोड मार्गे खानापूर फाटा येथे विसावणार आहे. त्यात किमान एक हजार दुचाकी स्वार सहभागी होतील असे नियोजन केले आहे.

परभणी : मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चात परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठे सहभागी करण्याचा निर्धार रविवारी (ता.30) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत करण्यात आला आहे. त्यासाठी चार दिवस आधीच मुंबईकडे प्रस्थान करण्याचे नियोजन केले आहे. दरम्याण मोर्चाच्या जागृतीसाठी परभणी शहरात चार ऑगस्ट रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज मुंबईत ऑगस्ट क्रांती दिनी (ता.नऊ) कोटींच्या संख्येत एकवटणार आहे.

त्यासाठीचे राज्यभरात बैठका, नियोजन अंतिम टप्यात आले आहे. परभणीत महात्मा फुल ेविद्यालयाच्या कै.आण्णासाहेब गव्हाणे सभागृहात रविवारी (दि. 30) जिल्हास्तरीय नियोजन बैठक पार पडली. त्यात मोर्चाचे नियोजन करण्यात आले.मोर्चाला जिल्ह्यातून किमान एक लाख मराठा समाज सहभागी होईलच असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती केली  जात आहे. गावोगावी बैठकांवर जोर दिला जात आहे. समाजातील सर्व घटकांना त्यात सहभागी केले आहे. बॅनर, पोस्टर,स्टिकर आदींच्या माध्यमातून मोर्चाला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  जिजामाता मैदान भायखळा ते आझाद मैदान मुंबई असा मोर्चा मार्ग राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकाच वेळी होणारी गर्दी लक्षात घेता चार दिवस आधीच मुंबईत दाखल होण्यास सांगीतले आहे.ता.सहा ऑगस्ट रोजी चार रेल्वे गाड्यांनी मुंबईकडे जाण्यास सुरुवात होणार आहे. सहा ते आठ ऑगस्ट दरम्याण शक्यतो सार्वजनीक वाहनांनी मोर्चाला यावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. यावेळी शासनापुढे ठेवलेल्या मागण्यांचे वाचन करण्यात आले.मोर्चा शिस्तीत निघावा यासाठी जिल्ह्यातून पाच हजार स्वंयसेवक तयार केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा संपर्क कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: marathi news maratha kranti morcha mumbai parbhani