बहुजनांनी नाकारली गुढी, फडकविला शिवरायांचा भगवा ध्वज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद : गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश बहुजन कुटुंबीयांनी पारंपरिक गुढी न उभारता रविवारी (ता. 18) आपल्या घरांवर एकपाती भगवी पताका उभारून संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहराबरोबरच ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसून आले.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये चैत्र प्रतिपदा या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. महाराष्ट्रात त्याला "गुढीपाडवा', तर कर्नाटक व आंध्रप्रदेशात "उगादी' म्हणतात. अनेकजण या दिवसाला शुभमुहूर्त मानून नवीन खरेदीही करतात; पण वर्ष 1689 मध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. परिणामी, हा दिवस स्वराज्यासाठी अशुभ ठरला. त्यामुळे महाराजांची स्मृती कायम राहावी, यासाठी यंदा गुढी उभारू नये, असे आवाहन बहुजन संघटनांनी सोशल मीडियातून केले. त्याला प्रतिसाद देत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अनेक बहुजन कुटुंबीयांनी गुढीऐवजी एकपाती भगवी पताका फडकविली. शिवाय संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून नवीन खरेदी, गोडधोड करण्याचेही टाळले. 

व्हायरल मेसेजचा परिणाम 
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली. त्यामुळे हा दिवस अशुभ आहे. एवढेच नाही, तर मंगलकार्यात कलश सरळच असतो; पण नेमका तो गुढीपाडव्यालाच उटला का टांगला जातो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कडुनिंबाचा पाला घरी आणला जातो. एवढेच नाही, तर बांबूचा वापर हा तिरडीसाठी केला जातो. या सगळ्या बाबी संभाजी महाराजांच्या हत्येशी संबंधित असून, अशुभ आहेत. त्यामुळे गुढीऐवजी घरावर भगवा ध्वज फडकवून संभाजीराजांना अभिवादन करावे, असा मेसेज काही दिवासांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

Web Title: marathi news marathawada gudhi padwa sambhaji maharaj