माहूर संस्थानाला साड्यांच्या लिलावातून मिळाले 1 कोटी 7 लाख रुपये

बालाजी कोंडे
गुरुवार, 15 जून 2017

माहूर (जि. नांदेड) : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्रीरेणुकादेवी संस्थानाला मागील साधारण चौदा महिन्यात साडी पातळाच्या विक्री व लिलावातून तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

माहूर (जि. नांदेड) : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्रीरेणुकादेवी संस्थानाला मागील साधारण चौदा महिन्यात साडी पातळाच्या विक्री व लिलावातून तब्बल 1 कोटी 7 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

भाविकांनी अर्पण केलेल्या साड्या आणि इतर वस्तूंच्या लिलावातून संस्थानाला एप्रिल 2016 ते 15 जून 2017 या कालावधीत लिलाव आणि विक्रीतून एक कोटी रुपयांपेक्षाही अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लिलावामध्ये नऊवाह, सहावार, चोपडे, बिट्टा या साड्यांच्या प्रकाराचा समावेश होता. या कालावधीत एकूण 88 हजार 283 एवढ्या पातळाची विक्री झाली. त्यामध्ये 40 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंतच्या साड्यांचा समावेश होता. संस्थानाकडे आणखी 5 हजार 653 साड्या/पातळ शिल्लक आहेत, याबाबत संस्थानचे विश्‍वस्त चंद्रकांत भोपी यांनी "सकाळ'शी बोलताना माहिती दिली.

नांदेड : माहूर संस्थानाला साड्यांच्या लिलावातून मिळालेल्या उत्पन्नाबाबत माहिती देताना संस्थानचे विश्‍वस्त चंद्रकांत भोपी (व्हिडिओ : बालाजी कोंडे)

संस्थानच्या अध्यक्षपदी सविता बारणे
श्रीरेणूकादेवी संस्थान विश्वस्त समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार नांदेडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश सविता बारणे यांनी आज (गुरुवार) स्विकारला. त्यांनी प्रथम श्रीरेणूका देवीचे दर्शन घेवून आरती केली. संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात त्यांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, समीर भोपी, श्रीपाद भोपी यांनी अध्यक्षांचे स्वागत केले. तसेच मागील वर्षी संस्थानातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती, संस्थानची आर्थिक स्थिती, भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या सुविधांचा आढावा यावेळी बारणे यांनी घेतला. संस्थानच्या आर्थीक स्थिती विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

नांदेड : माहूर संस्थानाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून श्रीरेणुकादेवीची आरती करताना नांदेडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता

Web Title: marathi news marathawada news renukadevi maharashtra news