व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : हेडफोन लावून तरुणीशी मोबाईलवरून व्हॉट्‌सऍप कॉलवर बोलत बोलत विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी घडला. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघड झाली. 

अमोल रघुनाथ काकडे (वय 23, मूळ रा. काकडे कंडारी, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने यंदाच विद्यापीठातून एम. ए. इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो एम.फिल.च्या तयारीसाठी लागला होता. येथील शिवाजी वसतिगृह क्रमांक एकमध्ये तो राहत होता. कुटुंबीयांना भेटून तो परतूरहून (जि. जालना) सोमवारी (ता. 28) विद्यापीठात आला होता. आज दुपारी तो एकटाच खोलीत होता. त्यानंतर त्याचे एका तरुणीशी व्हॉट्‌सऍप व्हॉइस कॉलवर संभाषण सुरू होते. त्याच वेळी त्याने गळफास घेतला. 

काही वेळानंतर त्याचे मित्र दुचाकीची किल्ली घेण्यासाठी वसतिगृहातील खोलीसमोर आले. त्यांनी दरवाजावर थाप मारली; पण आतून प्रतिसाद न आल्याने मित्रांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले त्या वेळी अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. बेगमपुरा पोलिसांनी अमोलला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

प्रेम... ब्रेकअप... अँड..... 
अमोल घरात एकुलता होता. त्याचा फोन आल्याशिवाय आई जेवण करीत नसे. इतिहास विषयातील एम.ए. पूर्ण केल्यानंतर त्याने एम.फिल.ची प्रवेश परीक्षा दिली होती. दुसऱ्या तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे पहिलीशी त्याचे 'ब्रेकअप' झाले होते. मग दुसरीशीही लग्नावरून बिनसले. त्याने आत्महत्या करण्याची धमकी देऊन फोनवर बोलत असतानाच आत्महत्या केली. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

Web Title: marathi news marathi websites aurangabad marathwada