बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टी

बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टी

बीड : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडतो असून मागील २४ तासांत परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात विक्रमी पाऊस झाला आहे , महत्वाचे हे की, परळी तालुक्यातील नागापूर १५५ मिमी तर पिंपळगाव गाडे महसूल मंडळात ११८ मिमी इतका जोरदार पाऊस झाल्याची नोंद पर्जन्य मापकावर झाली आहे , अंबाजोगाई तालुक्यातील सर्वच पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून आता बीड जिल्ह्यातील ६६६.३६ मिमी ही पावसाची वार्षिक सरासरीही ओलांडली असून आता १०२.५७ टक्के पाऊस झाला आहे.

परतीच्या वाटेवरील मान्सूनने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर आणि परळी या तालुक्यातील एकूण १३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची (एका महसूल मंडळात किमान ६४ मिमीपेक्षा अधिक) नोंद जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्य मापकावर झाली आहे.

इथे झाली अतिवृष्टी 

  • नागापूर - १५५ मिमी (ता.परळी)
  • गाडे पिंपळगाव- ११८ मिमी (ता. परळी)
  • परळी - ९३ मिमी
  • बीड -७० मिमी,(ता. बीड)
  • रेवकी- ६७ मिमी (ता.गेवराई)
  • दासखेड- ८० (ता. पाटोदा)
  • मोहखेड - ७७ मिमी (ता.धारूर)
  • दिंद्रुड- ८० मिमी (ता. माजलगाव)
  • अंबाजोगाई तालुका:- 
  • अंबाजोगाई:- ८९, घाटनांदूर :- ७५, लोखंडी सावरगाव:- ७१, बरदापुर:- ८८, ममदापूर पाटोदा:- ७२ मिमी
  • अंबाजोगाई तालुक्यात ७९ मिमी तर परळी तालुक्यात विक्रमी ८७.४० मिमी पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे, याशिवाय बीड- ३७.५५, पाटोदा - ४७, आष्टी- ६.७, गेवराई- ४३.१०, शिरूर- २८.६७, वडवणी- १७.५० केज- ३६, माजलगाव- ३४ तर धारूर तालुक्यात ६१.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस, आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिमी इतकी असून १ जून ते ३१ आक्टोबर या कालावधीत हा पाऊस पडत असतो, यंदा सुरुवातीला पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी हतबल झाले होते, मात्र नंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले, खंड पडलेल्या पावसाचा अनेक ठिकाणी मूग, उडीदावर फटका बसला आहे. 

जिल्ह्यात मागील २४ तासांत परतीचा पाऊस जोरदार बरसला असून या पावसामुळे गोदावरी, कृष्णा खोऱ्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com