क्रीडा विभागाची किमया; खासदार झाल्या 'नामदार' 

प्रशांत बर्दापूरकर
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

अंबाजोगाई : 'दादा', 'भैय्या', 'नाना', 'साहेब', 'लाडके', 'भाग्यविधाते' अशी विशेषणे कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांसाठी हमखास वापरली जातात. विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या नावासमोर 'आमदार' किंवा 'खासदार' हे कायमस्वरूपी जोडलेले असते. कधी 'माजी' झाले, तरीही या पदव्या कायम असतात. पण नावासमोर 'नामदार' लावण्यासाठी संबंधित राजकीय व्यक्ती राज्यमंत्री, विधिमंडळाच्या एखाद्या समितीचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री असावी, असे स्पष्ट संकेत आहेत; पण शालेक शिक्षण व क्रीडा विभागाने शासकीय कोनशिलेवर आणि बॅनरवर चक्क खासदार डॉ.

अंबाजोगाई : 'दादा', 'भैय्या', 'नाना', 'साहेब', 'लाडके', 'भाग्यविधाते' अशी विशेषणे कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांसाठी हमखास वापरली जातात. विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या नावासमोर 'आमदार' किंवा 'खासदार' हे कायमस्वरूपी जोडलेले असते. कधी 'माजी' झाले, तरीही या पदव्या कायम असतात. पण नावासमोर 'नामदार' लावण्यासाठी संबंधित राजकीय व्यक्ती राज्यमंत्री, विधिमंडळाच्या एखाद्या समितीचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट मंत्री असावी, असे स्पष्ट संकेत आहेत; पण शालेक शिक्षण व क्रीडा विभागाने शासकीय कोनशिलेवर आणि बॅनरवर चक्क खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नावसमोर 'नामदार' शब्द वापरून विभागाची दिवाळखोरी जाहीर केली आहे. 

अंबाजोगाई येथे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग व युवक सेवा संचालनायाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या अंबाजोगाई तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन हॉल, जिम हॉल, धावण्याचा मार्ग आणि विविध खेळांच्या मैदानासाठी सपाटीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठीच्या कोनशिलेवर प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा उल्लेख आहे; मात्र क्रीडा विभागाने त्यांच्या नावासमोर 'नामदार' असे विशेषण लावले आहे. 

खेड्या-पाड्याच्या एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याला लावलेले विशेषण समजण्यासारखे असते. पण शासनाच्या एखाद्या जबाबदार विभागानेच संकेत पायदळी तुडवून खासदार असलेल्या व्यक्तीला मंत्री, राज्यमंत्री, महामंडलाचे अध्यक्ष आणि घटनात्मक दर्जाच्या पदासाठी वापरले जाणारे 'नामदार' हे विशेषण वापरल्याने विभागाचे हसू झाले आहे. 

लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मताधिक्‍याने विजयी झाल्या. त्यामुळे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जागी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल, अशी स्थानिक कार्यकर्त्यांना आशा वाटत होती. पण राजकारणात नवख्या असल्याने आणि पहिलीच टर्म असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. पण त्यांच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी क्रीडा विभागाने त्यांच्या नावासमोर 'नामदार' लिहिले नाही ना, अशी चर्चाही रंगत आहे.

Web Title: marathi news marathi websites Beed news Pritam Munde