बस घुसली घरात; 12 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जालना - तालुक्यातील जालना-देऊळगाव राजा रोडवरील जमावाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची बस मध्यरात्री घरात घुसली. या अपघातामध्ये एक दुचाकी आणि तीन चाकी ऑपे रिक्षाचा चुरडाला झाला आहे. दरम्यान सुदैवाने या भीषण अपघातात जीवित्त हानी झाली नाही. मात्र बस चालकासह 11 प्रवाशी जखमी झाले आहेत.

औरंगाबाद अकोला ही बस (क्र. एमएच 20, बीएल 4057) चालकाचा ताबा सुटल्याने बस जामवाडी येथील बाळू इंगळे यांच्या घरात गुसली. या घरा समोर उभा असलेली दुचाकी (क्र. एमएच 21, एवाय 0955) व नवीन तीन चाकी ऑपे रिक्षाचा चुराडा झाला. दरम्यात घरात झोपलेल्या बाळू इंगळे, रेणुका इंगळे, अमोल इंगळे आणि अविनाश इंगळे यांना सुदैवाने काहीच झाले नाही. मात्र या अपघात मध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातमध्ये बस चालक आणि 11 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: marathi news marathwada bus accident people injured