औरंगाबाद - आयुक्तांच्या निगराणीत कचरा टाकण्याचा बेत फसला

आदित्य वाघमारे
गुरुवार, 1 मार्च 2018

औरंगाबाद : कचराकोंडीत सापडलेल्या शहराचा कचरा पर्यटनस्थळ मकबरा, औरंगाबाद लेणी आणि हनुमान टेकडीमागे टाकण्यासाठी खुद्द महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर 15 गाड्यांच्या ताफ्यासह आले होते. नागरिकांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे या पथकाला आल्या पावली माघारी परतावे लागले.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा सापडत नसल्याने महापालिका सध्या नव्या जागांचा शोध घेत आहे. गुरुवारी (ता. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर पंधरा कचऱ्याने खचाखच भरलेल्या गाड्या घेऊन हनुमान टेकडी आणि औरंगाबाद लेणी परिसरात आले. पोलीस बंदोबस्तासाह आलेल्या या ताफ्याची नागरिकांना कुणकुण लागली असता अनिल भिंगारे, योगेश पवार, अरुण शेळके, ज्ञानेश्वर कोकने, रामनाथ शेळके, कचरू शेळके, प्रतिभा जगताप, संदीप थोरात आणि अन्य नागरिकांनी या गाड्या अडवल्या. ऐतिहासिक परिसर असलेल्या या भागात कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांचा संताप झाला. नागरिकांचा विरोध पाहून आयुक्तांनी माघार घेत या कचऱ्याच्या गाड्या माघारी फिरवल्या.

Web Title: Marathi news marathwada news aurangabad improper waste management commissioner