औरंगाबाद - एमआयडीसी विरोधात उद्योजकांच्या बोंबा!

आदित्य वाघमारे
गुरुवार, 1 मार्च 2018

औरंगाबाद : महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या चुकीच्या धोरणांविरोधात औरंगाबादेत उद्योजकांनी गुरुवारी  (ता. 1) आंदोलनाचे शस्त उपसले. एमआयडीसी आणि चुकीच्या धोरणांविरोधात उद्योजकांनी बोंब मारून आपले आंदोलन केले. 

औरंगाबाद : महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या चुकीच्या धोरणांविरोधात औरंगाबादेत उद्योजकांनी गुरुवारी  (ता. 1) आंदोलनाचे शस्त उपसले. एमआयडीसी आणि चुकीच्या धोरणांविरोधात उद्योजकांनी बोंब मारून आपले आंदोलन केले. 

वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एमआयडीसीने अद्याप ठोस पावले टाकली नसल्याने गुरुवारी (ता. 1) लाक्षणिक उपोषण केले. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन दिवसभर सुरू होते. मराठवाडा असोसिएशन फॉर समाल स्केल अँड अग्रीकल्चर (मासीआ), चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (सीएमआयए) आणि वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशन (डब्ल्यूआयए) चे अध्यक्ष अनुक्रमे सुनील किर्दक, प्रसाद कोकीळ, वसंत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मागण्या मान्य ना झाल्यास आठ दिवस समोहिकरित्या उद्योग बंद करण्याची हाक यावेळी देण्यात आली. यावेळी वाळूज, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सुमारे 500 उद्योजक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईविरोधात नाराज होऊन उद्योजकांनी राज्याबाहेर आपले उद्योग हलवण्याचा इशारा दिला होता. 

या आहेत मागण्या.. 
1. ऑरेंज आणि ग्रीन कंपन्यांना जलनिस्सारण करातून वागलब्यात यावे. 
2. भाडेतत्वावर असलेल्या जागेत उद्योग चालवणाऱ्या उद्योजकांना स्वतःच्या जागा देण्यात याव्या. 
3. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील बी सेक्टर मध्ये असलेल्या कचरा डेपो हटवण्यात यावा. 
4. चिकलठाणा वसाहतीत नव्याने रस्त्याची बांधणी करणे. 
5. ग्रामपंचायत कराची वसुली एमआयडीसीने करत सिंगल विंडो पद्धत सुरू करण्यात यावी.

Web Title: Marathi news marathwada news aurangabad industrialist oppose to midc