"महा'थकबाकीमुळे महावितरण हतबल

अनिल जमधडे
शुक्रवार, 2 मार्च 2018

औरंगाबाद : प्रचंड थकबाकी, वीजगळती यामुळे महावितरणची अवस्था पोखरलेल्या डोंगरासारखी झाली आहे. राज्यात 38 हजार कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यात उर्वरित महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांची थकबाकी 17 हजार कोटी, तर मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांची थकबाकी बारा हजार कोटी रुपये आहे. एकूणच थकबाकीने महावितरणचा डोलारा डळमळीत झाला आहे. 

औरंगाबाद : प्रचंड थकबाकी, वीजगळती यामुळे महावितरणची अवस्था पोखरलेल्या डोंगरासारखी झाली आहे. राज्यात 38 हजार कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यात उर्वरित महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांची थकबाकी 17 हजार कोटी, तर मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांची थकबाकी बारा हजार कोटी रुपये आहे. एकूणच थकबाकीने महावितरणचा डोलारा डळमळीत झाला आहे. 

महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा उद्देश नाही. मात्र, विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वीजगळतीचेही मोठे प्रमाण असल्याने महावितरणची यंत्रणा हतबल आहे. थकबाकी वसुलीशिवाय ग्राहकांना अखंडित, पुरेसा वीजपुरवठा करणे मोठे आव्हान आहे. 

अशी आहे थकबाकी (आकडे कोटीत) 

मराठवाडा प्रादेशिक विभाग 
औरंगाबाद- 2223.04, जालना- 1475.38, बीड- 1994.89, हिंगोली- 803.10, लातूर- 1402.89, नांदेड- 1526.93, उस्मानाबाद-1443.10, परभणी- 1342.90, एकूण- 12212.23 कोटी. 

विदर्भ प्रादेशिक विभाग 
अकोला- 436.50, अमरावती-174.12, भंडारा-220.65, बुलढाणा-1153.13, चंद्रपूर-124.91, गडचिरोली-141.17, गोंदिया-175.84, नागपूर- 580.37, वर्धा- 158.14, वाशिम- 434.56, यवतमाळ- 1248.55. एकूण- 5648.82 कोटी. 

कोकण प्रादेशिक विभाग 
पालघर- 238.70, रायगड- 417.38, रत्नागिरी-175.15, सिंधुदुर्ग- 15.11, ठाणे- 2676.94. एकूण- 3523.27 कोटी. 

उर्वरित महाराष्ट्र प्रादेशिक विभाग 
नगर- 5574.31, धुळे- 907.20, जळगाव-2417.46, कोल्हापूर-351.05, नंदुरबार- 663.49, नाशिक- 1681.58, पुणे-2039.49, सांगली- 618.33, सातारा- 377.61, सोलापूर- 2923.90 एकूण- 17554.41. 

व्याजासह आकडा मोठा 
राज्यातील एकूण 14,450,383 ग्राहकांची मूळ थकबाकी 24034.58 कोटी असून, व्याजाची रक्कम 14904.12 कोटी रुपये आहे. व्याजासह एकूण थकबाकी ही 38938.74 कोटींवर गेली आहे. 

कर्मचाऱ्यांपुढे वसुलीचे आव्हान 
कोट्यवधींची थकबाकी असताना, बील भरण्याचे प्रमाण कमी आहे. उलट विविध कारणांमुळे महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे आदी प्रकार घडत आहेत. परिणामी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करायचे कसे, असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. 

उद्दिष्टाप्रमाणे थकबाकी वसूल न झाल्यास सुरळीत वीजपुरवठा करणे अशक्‍य होणार आहे. सध्या शून्य थकबाकी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे. ग्राहकांनी महावितरणची बाजू समजून घेणे आवश्‍यक आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांची बाजू समजून तक्रारींचे तातडीने निराकरण केले पाहिजे, असे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.  

Web Title: Marathi news marathwada news aurangabad mseb department