जायकवाडी 88 टक्के भरले; कधीही पाणी सोडणार

राजेभाऊ मोगल
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर पोहचला आहे. येत्या काही दिवसातच तुडूंब भरण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे कधीही पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

मराठवाड्यातील मोठ्या 11 मोठ्या धरणांपैकी सिना कोळेगाव शंभर टक्‍के भरले आहे. निम्न तेरणा 95.41, मांजरा 88.04, निम्न दुधना 69. 02 विष्णुपुरीमध्ये 82.68 एवढा पाणीसाठा झाल्याची नोंद असताना दुसरीकडे तीन प्रकल्पाची पातळी 20 टक्‍याच्या पुढे जाऊ शकली नाही. 

जूनच्या सुरवातीला वरुणराजाने जोरदार बरसत शेतकऱ्यांना वेळीच कामाला लावले होते. मात्र, पेरणी पूर्ण होताच लंपडाव सुरु केला. यामुळे अनेक भागात दुबार तर काही ठिकाणी तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली. मोठे कष्ट घेऊन पेरणी करूनही पिके ऐन भरात आलेले असतानाच तब्बल 54 दिवस पावसाने दडी मारली. यामुळे हलक्‍या जमिनीवरील बहुतांश पिके होण्याचे नाहिसे झाले. शिवाय, पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा देखील प्रश्‍न निर्माण झाला होता. दरम्यान, पोळ्याच्या तीन दिवसआधी पावसाने आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला. या पावसामुळे कापसासह अन्य काही पिकांना जीवदान मिळाले. 

अजूनमधून मुसळधार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील धरणामध्येही चांगला पाणीसाठा झाला आहे. जूनमध्ये जायकवाडीत अत्यल्प पाणीसाठा होता. मात्र, उर्ध्व भागात चांगला पाऊस होत असल्याने बुधवारी (ता. 20) हे धरण 88 टक्‍याच्या पुढे सरकले असल्याने भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. उर्ध्व भागातून जर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर दरवाजे उघडावे लागणार आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जात आहे. 

मागील महिन्यातच विष्णुपुरी धरण तुडूंब भरले होते. आता यातील साठा 82.68 एवढा आहे. आता सिना कोळेगाव धरण शंभर टक्‍के भरले आहे. त्यापाठोपाठ निम्न तेरणा 95. 41, मांजरा 88, निम्न दुधना 69.02, माजलगाव 60.45 एवढे भरले आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे निम्न मानार 19.86, पेनगंगा 9.42 तर सर्वात कमी येलदरी धरणात 8.20 इतकाच पाणीसाठा असल्याची नोंद आहे. यामुळे काही धरणे भरण्यासाठी अजून चांगल्या पावसाची गरज आहे. 

Web Title: Marathi news Marathwada news drought rain Jayakwadi dam