परभणी शहरासह जिल्ह्यात धुके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

परभणीसह जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, पुर्णा, पालम व गंगाखेड तालुक्यात शनिवारी पहाटे पासून धुके पसरले होते. सकाळी बाहेर फिरायला निघालेल्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद लुटला. परभणी व पुर्णा रेल्वे स्थानकात धुके पसरल्याने मनमोहक दृश्य पहावयास मिळत होते.

परभणी : परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी (ता.१७) सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. पहाटे पासून जिल्ह्यावर पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरल्याने या वातावरणाचा आनंद नागरिकांनी अनुभवला.

परभणीसह जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, पुर्णा, पालम व गंगाखेड तालुक्यात शनिवारी पहाटे पासून धुके पसरले होते. सकाळी बाहेर फिरायला निघालेल्या नागरिकांनी या धुक्याचा आनंद लुटला. परभणी व पुर्णा रेल्वे स्थानकात धुके पसरल्याने मनमोहक दृश्य पहावयास मिळत होते.

अगदी पहाटे पासून पसरलेले हे धुके सकाळी आठ वाजे पर्यंत होते. त्यानंतर सूर्य दर्शन झाल्याने धुके गायब झाले. शुक्रवारी (ता. १६) दिवस भर वातावरण ढगाळ होते. काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्या मुळे वातावरण थंड बनले होते. वातावरणातील हा बदल अजून एक दिवस राहील असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा तील हवामान अंदाज केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Marathi news Marathwada news fog in Parbhani