नांमकाचे कालवे ठरताहेत धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

गंगापूर - तालुक्‍यात नांदूर मधमेश्वर कालव्याचे ७५ टक्के काम रखडल्याने अर्धवट कालवे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. दुष्काळी गंगापूर-वैजापूर तालुक्‍यासाठी नाशिक जिल्ह्यात भाम, वाकी, भावली, मुकणे धरणे बनली आहेत. मात्र, हक्काचे पाणी वाहून आणणारे कालवेच तयार नसल्याने पन्नास वर्षांपासून शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे. 

धरणाच्या कालव्यात अनेक ठिकाणी येण्या-जाण्यास पुलाची सुविधा नाही. पाण्यात उतरण्यास घाट, संरक्षक कठडे नाहीत, बोगद्याच्या तोंडावर जाळी नाही, अस्तरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने पाणी गळती होऊन पिकांचे नुकसान होत आहे. 

या परिस्थितीमुळे तीन-चार वर्षांत नागरिक आणि ३ ते ४ जनावरे वाहून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याकडे नांमका विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. एकीकडे पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी मैलोन्‌मैल पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी रोज वाया जात असल्याचे पहावयास मिळत आहे. 

नांमकाच्या अस्तरीकरणाचे काम झाले नसल्याने कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती होत  असल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. नवीन पिके घेता येत नाहीत; शिवाय नियोजनाच्या अभावामुळे वेळेवर पाणी सोडले जात नसल्याने पिके वाळून जात आहेत. 
- लक्ष्मणराव भुसारे, उपाध्यक्ष, गंगापूर साखर कारखाना

अनेक गावांजवळ कालव्यावरून जाण्या-येण्यास पूल नाहीत. संरक्षक कठडे नाहीत. पाण्यात उतरण्यास घाट नाहीत, सूचनाफलक लावलेले नाहीत.
- राजेंद्र वाबळे, उपसरपंच, बोलेगाव 

कालव्याला पाणीगळतीचे ग्रहण लागले आहे. पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दरवर्षी कालवा फुटीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी कालव्यांचे अस्तरीकरण उखडल्याने धरणाचे कालवे धोकादायक झाले आहेत. 
- सुरेश दंडे, तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Web Title: marathi news marathwada news gangapur