मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच स्वाभिमानीच्या जिल्हाधिक्षांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुळजापूर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांना बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ताब्यात घेतले. दुपारी साडेबारापर्यंत त्यांची सुटका करण्यात आली नव्हती.

तुळजापूर : मुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांना बुधवारी (ता. १३) पहाटे ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील यमगरवाडी येथील भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग नौकानयन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस हे बुधवारी तुळजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.

या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुळजापूर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांना बुधवारी पहाटे एकच्या सुमारास ताब्यात घेतले. दुपारी साडेबारापर्यंत त्यांची सुटका करण्यात आली नव्हती.

Web Title: Marathi news Marathwada news police arrested person