लातूर जिल्ह्यात वीज पडून मुलगी जखमी; गाय, म्हशीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

काही ठिकाणी गारा पडल्या. जिल्ह्यात साडे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरय़ांना हा मोठा फटका आहे. याचे तीन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

लातूर : लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील साडे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

याचे तीन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने जिल्हाधिकारी कार्यालायाला दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात वीज पडून एक मुलगी जखमी झाली आहे. तर वीज पडून एक गाय व म्हशीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

काही ठिकाणी गारा पडल्या. जिल्ह्यात साडे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरय़ांना हा मोठा फटका आहे. याचे तीन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. दरम्यान सोमवारी (ता. १२) अनसरवाडा येथे सुरेश गोबाडे यांची गाय वीज पडून मरण पावली. तर होसूर (ता. निलंगा) येथे संगीता ज्ञानोबा बिरादार (वय ११) ही मुलगी वीज पडून जखमी झाली आहे. तर हाडोळी (ता. निलंगा) येथे मंगळवारी पहाटे वामन मंदाले यांची म्हैस वीज पडून ठार झाली आहे.
 

Web Title: Marathi news Marathwada news rain in latur