सदाभाऊंनी घातला 'हिरवा गॉगल': राजू शेट्टी

हरि तुगावकर
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मराठवाड्यात गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणा देवून शेतकऱयांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे. शेतातील कसपट काढण्यासाठी दहा हजार रुपये लागणार आहेत. शासन मत मात्र दोन हजार चारशे रुपये देणार आहे. शासन शेतकऱयांची चेष्ठा करीत आहे. कर्जमाफीचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले असे शासन सांगत आहे.

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात `चाय पे चर्चा` केली होती. शेतकऱयांच्या आत्महत्या होणार नाहीत असे धोरण राबवण्याचे आश्वासन दिले होते.पण जेथे त्यांनी ही चर्चा केली तेथेच सर्वात जास्त शेतकऱयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या चर्चेनंतर शेतकऱयांच्या हातून `कप` गेला. आता ते `खेती पे चर्चा` करणार आहेत. यात शेतकऱयांच्या हातून जमिन जावू नये हीच अपेक्षा आहे, असे मत शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हिरवा गॉगल घातल्याने त्यांना सर्व शिवार हिरवेगार दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यात गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मदतीची घोषणा देवून शेतकऱयांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे. शेतातील कसपट काढण्यासाठी दहा हजार रुपये लागणार आहेत. शासन मत मात्र दोन हजार चारशे रुपये देणार आहे. शासन शेतकऱयांची चेष्ठा करीत आहे. कर्जमाफीचे २३ हजार कोटी रुपये बँकेत जमा केले असे शासन सांगत आहे. पण हे कोणाच्या खात्यावर गेले हे मात्र सांगत नाही. भूलथापा देवून हे शासन सत्तेवर आले आहे. येत्या काळात शेतकऱयांच्या प्रश्नावर मंत्र्यांना झो़डपून काढण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

साखरेचे भाव पाडण्याचा प्रकार हा संशयास्पद आहे. व्यापारयावरील स्टॉकवरील नियंत्रण उठवल्यानंतर हे भाव पडले आहेत. त्यामुळे शासनाने गोदाम तपासून दोन महिन्यात झालेली साखरेची खरेदी विक्रीची चौकशी करावी अशी मागणी आहे. कारखान्यांनी ठरलेली उचल दिलीच पाहिजे या करीता ता. १७ रोजी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत संघटना सोडून गेल्याने संघटनेला काहीच फरक पडला नाही. आता त्यांची दृष्टी बदलली आहे. हिरवा गॉगल त्यांनी घातला आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱयांच्या प्रश्नाऐवजी सर्व शिवार हिरवे दिसू लागले आहे. सर्वत्र आनंदी आनंद दिसत आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी यावेळी केली.

आगामी निडवणुकीत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकरयांच्या प्रश्न सोडविणाऱयासोबत आमची चर्चा सुरु आहे. निर्णय घेतलेला नाही. बीडमध्ये आमचे पोस्टर काढले व मुख्यमंत्र्यांचे मात्र ठेवले गेले भाजपला ऐवढी मस्ती आली असेल तर त्यांनी मैदानात उतरावे मी तयार आहे, असे ते म्हणाले. यावेळी सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Marathi news Marathwada news Raju Shetty criticize government