पाण्यासाठी आंदोलक तीन तासांपासून पाण्याच्या टाकीवर

रामदास साबळे
शनिवार, 17 मार्च 2018

केज - मागच्या नऊ वर्षांपूर्वी हाती घेतलेली पाणी योजना अद्यापही कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या विरोधात तालुक्यातील विडा येथील आंदोलक शनिवारी (ता. १७) तीन तासांपासून पाणी टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. टाकीवरुन उड्या मारण्याचा इशारा आंदोलकांनी निवेदनात दिला होता. 

केज - मागच्या नऊ वर्षांपूर्वी हाती घेतलेली पाणी योजना अद्यापही कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या विरोधात तालुक्यातील विडा येथील आंदोलक शनिवारी (ता. १७) तीन तासांपासून पाणी टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. टाकीवरुन उड्या मारण्याचा इशारा आंदोलकांनी निवेदनात दिला होता. 

विडा (ता. केज) येथे 1 कोटी 87 लाख रुपयांची पाणी योजना हाती घेतली. नऊ वर्षांपूर्वी हाती घेतलेली योजना अद्यापही अर्धवट आहे. ग्राम पाणी पुरवठा समितीने यातील 1 कोटी 71 लाख रुपयांचा निधी उचलला असून, कामाच्या मुल्यांकनात केवळ 1 कोटी 7 लाख रुपयांचे काम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीने मागच्या अनेक वर्षांपासून ६३ लाख रुपये हातावर ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला होता. या योजनेच्या कामाची चौकशी, फेरमुल्यांकन करुन दोषींवर कारवाई करावी आणि पाणी योजना कार्यान्वित करावी, अन्यथा शनिवारी (ता. १७) पाणी टाकीवर चढून उड्या मारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. याबाबत कुठलेली ठोस आश्वासन वा कार्यवाही न झाल्याने शनिवारी उपसरपंच बापूसाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाघमारे, सुहास पवार, पराक्रम घुटे, बापू जाधव, मदन पटाईत अविनाश सिरसट आदी टाकीवर चढले आहेत. 

जणू देणे घेणेच नाही
दरम्यान, या योजनेबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि योजना कार्यान्वित व्हावी यासाठी मागणी केली. मात्र, केवळ आश्वासने मिळाली. त्यामुळे या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी यासाठी टाकीवरुन उड्या मारण्याचा इशारा दिला होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठांना याचे कुठलेही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवेदनानंतर वरिष्ठांकडून कुठले आश्वासन मिळाले नाही. तसेच, आंदोलक सकाळी साडेनऊ वाजता टाकीवर चढलेले असून, दुपारी पावणे एक वाजेपर्यंत टाकीवर चढून घोषणा देत होते. तरीही कोणी वरिष्ठ इकडे फिरकला नाही. केवळ एका कनिष्ठ अभियंते या ठिकाणी आले आहेत. मात्र, संबंधीतांनी याअगोदरही अनेक वेळा आश्वासने दिलेली असल्याने वरिष्ठांनी ठोस आश्वासन दिल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे.
- पूर्ण दत्ता

Web Title: marathi news marathwada news water crisis protest