उस्मानाबादेत गुढ आवाजाची मालिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

उस्मानाबाद - जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा या तीन तालुक्यांतील अनेक गावांत गुरुवारी (ता. १८) दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी मोठा गुढ आवाज होऊन जमीन हादरली. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अशा गुढ आवाजाची मालिका सुरूच आहे. 

गुरुवारी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी जमिनीतून मोठा गुढ आवाज झाला. या आवाजामुळे जमीन हादरली. घराची तावदानेही हादरली. उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील बेंबळी परिसर, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, अणदूर, लोहारा शहरासह तालुक्यातील काही गावांमध्येही दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी गुढ आवाज होऊन जमीन हादरली. गेल्या तीन वर्षांपासून महिन्यातून एक ते दोन वेळा जमिनीतून असा मोठा गुढ आवाज होतो. हा आवाज दोन ते तीन सेकंद असतो. या आवाजाची तीव्रता मोठी असते. त्यामुळे खिडक्या, दरवाज्यांची तावदाने हादरतात. गुरुवारीही असाच आवाज झाला.

Web Title: marathi news marathwada Usmanbad