भाजपचा मुंबईत महा-भाजप, महा-मेळावा 

प्रकाश बनकर
शनिवार, 17 मार्च 2018

औरंगाबाद - शिवसेना मुंबईत दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करते. त्याच पद्धतीने भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त महा-भाजप, महा-मेळावच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. 6 एप्रिल रोजी भाजप पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर हा महा मेळावा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून 3 लाख कार्यकर्ते या मेळाव्यासाठी येणार असून, या विषयी राज्यभरात ठिकठिकाणी नियोजनाची बैठक घेण्यात येत आहे. 

दरम्यान, शनिवारी(ता.17) औरंगाबादेत भाजप प्रदेशाअध्यक्ष रावसाहेब दानवे याच्या अध्यक्षतेखाली तापडिया नाट्य मंदिरात मराठवाडस्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या महा मेळाव्यासाठी राज्यभरात नियोजन बैठका घेण्यात येत आहे. या महा मेळाव्यास मराठवाड्यातुन 28 हजार कार्यकर्ते जणार आहेत. नांदेड येथे महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी तर लातूर येते मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बैठक घेतली. या महा मेळाव्याततून भारतीय जनता पक्ष मुंबईत एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार  असलायचे कळते.

राज्यभरातून 22 रेल्वे
या महा मेळाव्यासाठी राज्यभरातून जोरदार नियोजन करण्यात येत आहे. यासाठी 22 रेल्वे सोडण्यात येणार आहेत. एक बूथ 10 कार्यकर्ते असे यांचे नियोजन असणार आहे. प्रत्येकाला या महा मेळाव्यात सहभागी करण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. या बैठकीत खासदार दानवे यांनी आढावा घेतला.

Web Title: marathi news mumbai aurangabad BJP mahamelava