पंधरा जणांच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नांदेड - डमी परीक्षार्थी बसवून शासकीय सेवेत दाखल झालेल्या पंधरा जणांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. किनवट न्यायालयात आज त्यांना हजर करण्यात आले होते.

नांदेड - डमी परीक्षार्थी बसवून शासकीय सेवेत दाखल झालेल्या पंधरा जणांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. किनवट न्यायालयात आज त्यांना हजर करण्यात आले होते.

राज्यभर गाजलेल्या डमी परीक्षार्थी रॅकेटमध्ये मंगळवारी (ता. 7) सीआयडी पथकाने पंधरा जणांना अटक केली होती. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. हे सर्व परीक्षार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. यातील अनेकांना तर परीक्षा केंद्र कोणते होते याचीही माहिती नव्हती. एमपीएसी, विविध स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा भरतीत डमी परीक्षार्थी बसवून लाखोंची उलाढाल करण्यात आली होती.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मांडवी येथील प्रबोध राठोड हा सध्या अटकेत आहे. त्यासह अक्षय राठोड (सेवक, भूमी अभिलेख कार्यालय हिंगोली), अंकुश राठोड (गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह अर्जुनी मोरगाव, गोंदिया), मनोज जाधव (लिपिक, पाथर्डी तहसील कार्यालय), अमोल श्रीमनवार (समाज कल्याण निरीक्षक, नांदेड), रामहर्ष निळकंठवार (पशू पर्यवक्षक, पंचायत समिती, वैजापूर), सूरज चव्हाण (विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कर्जत, नगर), अमोल दासरवार (लिपिक, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड), विठ्ठल कोकुलवार (कनिष्ठ लिपिक, शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय, अवसरी, पुणे), साहेबराव चव्हाण (लिपिक, संसदीय कार्यविभाग, मंत्रालय), शिवलाल जाधव (सेवक, शासकीय निवासी शाळा, उमरी, नांदेड), सूरज जाधव (लिपिक, तहसील कार्यालय, पाचोरा, जळगाव), नरेश पवार (लिपिक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन, रायगड), श्रीकांत चव्हाण (विस्तार अधिकारी, सांख्यिकी, पंचायत समिती, जळकोट, लातूर), जगदीश राठोड (संरक्षण अधिकारी, सेनगाव, हिंगोली) यांचा यात समावेश होता.

Web Title: marathi news nanded news bogus student crime custory