नऊ वर्षांच्या मुलाचा गळफास बसून मृत्यू

संताेष जाेशी 
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

लाेहा तालुक्यातील पाेलिसवाडी येथील तिसरीत शिकणारा नऊ वर्षांचा विनाेद पांचाळ रविवारी सकाळी पाच वर्षांच्या बहिनीसाेबत घरात खेळत हाेता. त्यावेळेच विनाेदला स्टंटबाजी करण्याचे सुचले अाणि काेंडीला वडिलांचा मफलर बांधला अाणि स्वतःच्या गळ्याला बांधून घेत खेळू लागला. या खेळाखेळात विनाेदला अापला जीव जाईल याची पुसटशी कल्पना देखील नव्हती अाणि स्टूलवरुन ताे खाली लाेंबकाळला.

नांदेड : अापल्याकडे शक्ती अाल्याचे वाटते अाणि त्यातून स्टंट'करण्याचा प्रयत्न करतात....अनेकवेळा स्टंटबाजीच्या नादात त्यांना अापला जीव गमावावा लागल्याच्या घटनेत वाढ हाेताना दिसत अाहे. नांदेड जिल्हयातील लाेहा तालुक्यातील पाेलिसवाडी येथेही अशीच घटना घडली. घरात कुणीही नाही म्हणून दाेघे बहिन, भाऊ खेळत असताना स्टंट'बाजी करणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाला मफलरचा गळफास बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लाेहा तालुक्यातील पाेलिसवाडी येथील तिसरीत शिकणारा नऊ वर्षांचा विनाेद पांचाळ रविवारी सकाळी पाच वर्षांच्या बहिनीसाेबत घरात खेळत हाेता. त्यावेळेच विनाेदला स्टंटबाजी करण्याचे सुचले अाणि काेंडीला वडिलांचा मफलर बांधला अाणि स्वतःच्या गळ्याला बांधून घेत खेळू लागला. या खेळाखेळात विनाेदला अापला जीव जाईल याची पुसटशी कल्पना देखील नव्हती अाणि स्टूलवरुन ताे खाली लाेंबकाळला. बहिणीला याची कांहीच कल्पना नव्हती ती भाऊ खेळतच अाहे तिला वाटले. दरम्यान, बाहेरहून अालेल्या अाईने विनाेदची अवस्था पाहून तात्काळ नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा उपचारा अगाेदरच मृत्यू झाला हाेता.

विनाेदचे शवविच्छेदन करुन कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात अाले. विनाेदच्या दुर्देवी मृत्यूमुळे कुटूंबावर शाेककळा पसरली असून, या घटनेमुळे संपुर्ण पाेलिसवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात अाहे. या प्रकरणी लाेहा पाेलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.

Web Title: Marathi news Nanded news boy dead in Loha