परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे पत्नीने पेटवून घेऊन तर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पाथरी (जि. परभणी) - परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे पत्नीने पेटवून घेऊन तर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज (शुक्रवार) पहाटे पाथरी तालुक्‍यातील तांडा येथे सुरेखा पवार (वय 21) या विवाहित महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. तिच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये यश मिळाले नाही. सुरेखाच्या शरीराचा घटनास्थळीच कोळसा झाला. या घटनेनंतर तिचा पती बबलू पवार (वय 24) याने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी सातच्या सुमारास पाथरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

पाथरीमध्ये दहा दिवसांपूर्वीच एका वयोवृद्ध शेतकरी दांपत्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती.

Web Title: marathi news parbhani news couple suicide maharashtra news